50 हून अधिक पीडितांची न्यायासाठी एकत्र बैठक ; संयुक्त तक्रार देऊन सखोल चौकशीची मागणी केली जाणार
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील अनेकांना आर्थिक आमिष दाखवून दागिने ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. मालवण येथील एका कार्यलय माध्यमातून हा कथित आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे सांगत या प्रकरणातील 50 हून अधिक पीडितांची संयुक्त बैठक मालवण येथील संस्कार हॉल, धुरीवाडा येथे पार पडली.
बैठकीत सामूहिक तक्रारीचा अंतिम मसुदा मंजूर करण्यात आला असून सर्व पीडितांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच प्रत्येक पीडिताकडून स्वतंत्र तक्रार, दागिन्यांचा माध्यमातून फसवणून झालेला तपशील व उपलब्ध पुरावे संकलित करण्यात आले.
पीडितांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सुरक्षितपणे सोन्याचे दागिने ठेवून आकर्षक आर्थिक परतावा मिळेल, तसेच गरज भासल्यास सात दिवसांच्या पूर्वसूचनेनंतर दागिने परत मिळतील, असे सांगण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी आपले दागिने जमा केल्याचा दावा करण्यात आला.












