ओटवणे (प्रतिनिधी ) आज वटपौर्णिमा म्हणजे जन्मोजन्मी साता जन्मी हाच पती मिळो पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी व्रत करून वडाची पुजा करून पतीसाठी दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना करणारा महिलांसाठीचा जिव्हाळ्याचा सण.पुराणात आपल्या पतीचे गेलेले प्राण यमदेवाकडून भांडून वर मागत पतीला जिवंत करणारी सत्यवानाची सावित्री कलियुगात मात्र दुर्दैवी ठरली.पतीच्या दीर्घायुष्याच देण मागता मागता कलियुगातील या सावित्रीला मात्र आपला प्राण त्यागावा लागला. ही दुरदैवी घटना घडली ओटवणे शेरवाळवाडी येथे.
सुमिता सुरेश राऊळ वय ५५ या इतर सुवासिनि प्रमाणे वटपौर्णिमेच व्रत धरून सर्वांसमवेत वडाची पुजा करण्यासाठी ब्राह्मण मंदिर नजीक वडाकडे गेली असता पुजा झाल्यानंतर महिलांसोबत बसली हसत खेळत हा कार्यक्रम सुरु होता एकमेकांना वाण देण्याबरोबर चाललेल्या या कार्यक्रमात अचानक सुमिता राउळ यांना चक्कर आली.घाबरलेल्या महिलांनी त्वरित ही बाब पुरुष वर्गाची कानी घालत त्वरित त्यांना सावंतवाडी रुग्णालयात हलविले मात्र प्राथमिक अंदाजा नुसार हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगत मृत घोषित करण्यात आले .पतीसाठी दीर्घायुष्य मागण्यासाठी चे व्रत आणि प्रार्थना अखेर शेवटची ठरली त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात पती,दीर, पुतणी दोन मुलगे असा मोठा परिवार आहे येथील संदेश राऊळ व समीर राऊळ यांच्या त्या मातोश्री होय.मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Home ताज्या घडामोडी वटपौर्णिमेदिनी पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना ठरली अखेरची.महिलेचे दुर्दैवी निधन.













