रायसोनी फॉउंडेशन जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा 2026

रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन मार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धा 2026 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धेकारिता रायसोनी स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी प्रयोजकत्व दिले होते. सदरचे प्रयोजकत्व मिळण्याकरिता महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अरुण लखानी ह्यांची मोलाची मदत झाली. रत्नागिरी जिल्हा असोसिएशन मार्फत रायसोनी फॉउंडेशन आणि श्री. अरुण लखानी ह्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच उत्तम दर्जेदार बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध केल्याबद्दल सर्वंकश विद्यामंदिर चे देखील आभार मानण्यात आले.

सदर स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील सुमारे 130 खेळाडू सहभागी झाले होते.
ही स्पर्धा सर्वंकश विद्यामंदिर येथील बॅडमिंटन संकुलामध्ये आयोजित केली होती. ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. ओंकार हजारे, वस्तू व सेवा कर कमिशनर श्री. विकास पोवार साहेब, अमित मुळ्ये, सरोज सावंत मॅडम, राजेश आराध्यमठ, मंगेश प्रभुदेसाई, रजनीश महागावकर, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या स्पर्धेच्या निकालांवरून रत्नागिरी जिल्हा संघांची निवड केली जाणार आहे. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.