राजापुरात ‘माधव जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर्स’चे उद्घाटन

ब्रँडेड औषधांच्या तुलनेत ३० ते ७० टक्के सवलत;
सर्वसामान्यांची औषध खर्चातून होणार बचत
राजापूर (वार्ताहर): येथील एड. सुनिल मेस्त्री आणि सौ. अस्मिता मेस्त्री यांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील नव्या ‘माधव जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर’ चे उद्घाटन शनिवारी मोहन मेस्त्री यांच्या हस्ते फीत कापून तर नगराध्यक्षा एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, राजापूर शहरात ‘माधव जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर’ (स्वस्त जनऔषधी सेवा) सुरू करण्यात आले आहे.
या स्टोअर्सचा उद्घाटन प्रसंगी अर्बन बँक राजापूरचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, भाजापाचे ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदिप मालपेकर, नगरसेवक एड. जमिर खलिफे, एड. प्रविण नागरेकर, वास्तूशास्त्र तज्ज्ञ प्रशांत पाळेकर, व्हायब्रंट डिजिटलचे वैभव तोरस्कर, नरेंद्र पावसकर, जनआरोग्य जेनेरिक प्रा.लि. चे नितेश खाडे, अनिकेत खानविलकर यांसह एड. मेस्त्री परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी एड. मेस्त्री यांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. तर दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यवसायिक यांनी स्टोअर्सला भेट देवून शुभेच्छा दिल्या.
‘माधव जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर’ च्या माध्यमातून बाजारातील महागडया ब्रॅन्डेड औषधांच्या तुलनेत समान घटक आणि समान गुणवत्तेची औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल मोहन मेस्त्री आणि सौ. अस्मिता सुनिल मेस्त्री यांनी केले आहे.