मोकाट गुरे पकडण्याची मोहीम लवकरच : नगरपंचायतीचा निर्वाळा

देवगड: प्रतिनिधी

माेकाट गुरांच्या विषयावरून नगरपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करीत ग्रामस्थांनी मागणी केलेल्या माेकाट गुरे निर्मुलन कृती आराखड्याची अंमलबजावणी 30 दिवसात करा अन्यथा प्रशासनाविराेधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा दिला.यावेळी मुख्याधिकारी गाैरी पाटील यांनी माेकाट गुरे पकडण्यासाठी पथक स्थापन करून पकडलेल्या गुरांना ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नेने नगर येथे काेंडवाडा निर्माण करण्याचा निर्णय विशेष सभेत झाला आहे त्यानुसार तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.गुरांना टँगींग करण्याचा विषयही चांगलाच गाजला.यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक हाेत उपस्थित लाेकप्रतिनिधी आणि प्रशासनाला धारेवर धरले.मुख्याधिकारी गाैरी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देवून कायदेशीर दृष्टया टँगिंग प्रक्रिया राबविण्यात येईल मात्र ही प्रक्रिया तात्काळ राबविणे अशक्य असल्याचे सांगून गुरे पकडणे माेहिम व त्या गुरांना ठेवण्यासाठी काेंडवाडा उभारण्याची प्रक्रिया आठवड्यात करू असे सांगीतले.

माेकाट जनावरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी ताेडगा काढण्यासाठी ’प्रथम काेंडवाडा उभारावा’ या प्रमुख मागणीसह नगरपंचायतीने माेकाट गुरे निर्मुलन कृती आराखडा तयार करावा या मागणीसाठी साेमवारी देवगड-जामसंडे नगरपंचायतीत नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सह नगरसेवकांची चर्चा केली.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या.माेकाट गुरांमुळे एका व्यक्तिचा मृत्यु झाला.नागरिकांचा जीव गेल्यानंतर जागे हाेणार का असा संतप्त भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मांडल्या.माेकाट गुरांमुळे लहान माेठे अपघात झाले आहेत.यामुळे काेंडवाड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी अण्णा खवळे यांनी केली.यावेळी प्रशासनाच्यावतीने नगरपंचायत हद्दीतील 53 शेतकèयांना गुरे रस्त्यावर साेडू नयेत अशी पत्रे दिली असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा साै.मिताली सावंत, मुख्याधिकारी गाैरी पाटील, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदाेस्कर, नगरसेवक तेजस मामघाडी, साै.प्रणाली माने,शरद ठुकरूल, सुधीर तांबे, चंद्रकांत कावले, स्वरा कावले, मनिषा जामसंडेकर आदी उपस्थित हाेते.

यावेळी प्रा.गुरूदेव परूळेकर यांनी ग्रामस्थांनी तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती दिली.या कृती आराखड्यानुसार 30 दिवसात देवगड जामसंडे शहर माेकाट गुरे मुक्त करायचे आहे असे त्यांनी सांगीतले.या आराखड्यानुसार 30 दिवसात माेकाट गुरे माेहिम राबवावी, गुरांची नाेंदणी चार दिवसात युध्दपातळीवर हाेणे आवश्यक आहे, काेंडवाडा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावा, दंडात्मक कारवाई करण्यात यावी, वारंवार नियम माेडणाèयांवर कडक कारवाई करण्यात यावी, ग्रामस्थांचे 24 तासात तक्रार निवारण झाले पाहिजे यासाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करावी या मुद्दयांची अंमलबजावणी 30 दिवसात करावी अन्यथा प्रशासनाविराेधात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा दिला.तारामुंबरी येथे देवगड जामसंडे शहराच्या इतर भागातून येणाèया गुरांवर काय कारवाई करणार असा प्रश्न ज्ञानेश्वर खवळे यांनी उपस्थित केला यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी त्या गुरेमालकांनाही नाेटीसा दिल्या आहेत असे सांगीतले.पकडलेली गुरे सात दिवस ताब्यात ठेवून ती गुरे मालकांनी केलेल्या कारवाईची प्रक्रिया पुर्ण करून न नेल्यास लिलाव करण्यात येईल अथवा गाेशाळेच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यात येईल असे स्वच्छता सभापती बुवा तारी यांनी सांगीतले.माेकाट गुरांच्या प्रश्नाबाबत जे दाेन गुन्हे दाखल करण्यात आले ते केवळ येथील नागरिकांच्या डाेळ्यात धुळ ेकणारे असून चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले असे विजय कदम यांनी सांगीतले.गुरांना टँगिंग करण्याची प्रक्रिया प्राधान्यक्रमाने घ्या अशी मागणी भाजपा शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी केली.माधव कुळकर्णी यांनीही गुरांच्या टँगिंग प्रक्रियेचा विषय उपस्थित केला.

यावेळी मुख्याधिकारी गाैरी पाटील यांनी टँगिगची प्रक्रिया जलदगतीने हाेईल हे खात्रीने सांगू शकत नाही मात्र पथक स्थापन करून गुरे पकडण्याची माेहिम तात्काळ राबविणे व त्यांना ठेवण्यासाठी तात्पुरता काेंडवाडा उभारण्याची जबाबदारी घेतली असल्याचे सांगीतले.

बैठकीस उद्याेगपती नंदकुमार घाटे, बाळ खडपे, याेगेश चांदाेस्कर, नाना सारंग,प्रा. जी. टी. परुळेकर, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, साै.शामल जाेशी, अण्णा खवळे, वैभव करंगुटकर, याेगेश पाटकर, प्रकाश जाधव, वीरेंद्र कार्लेकर, विजय कदम,सुधीर मांजरेकर, प्रशांत वारीक, दयानंद पाटील, बाबू वाडेकर, माधव कुळकर्णी, गिरीश धाेपटे, यांच्यासह बहुसंख्य नागरिक, व्यापारीवर्ग, रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित हाेते.