एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम
लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी, दि. १४ जुलै रोजी सकाळी लांजा एस टी आगार आणि बस स्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करून त्याच्या नियमित संगोपनाची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत लांजा एसटी डेपो व बसस्थानक येथे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी काजू, जांभूळ, कोकम, बेहडा, वड, बहावा, आपटा, फणस आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. वनविभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात आली. तर गवाणे सामाजिक वनीकरण विभागाकडून २०० व श्रीकृष्ण हेगिष्टे यांच्या प्रयत्नातून भांबेड वनीकरण विभागाकडून १०० रोपे उपलब्ध झाली.
दरम्यान, या कार्यक्रमाला लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, वनपाल धुळू कोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शिवसेना विभागप्रमुख दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य दिपाली साळवी, वृषाली चव्हाण, रसिका मेस्त्री, शैलेश खामकर, दिपक कदम, प्रवासी संघटनेचे सचिव रविंद्र राणे, सदस्य जितेंद्र चव्हाण, विभागीय भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ-फुटाणे, आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, स.वा.नि.राजू पाटोळे, प्रभारक कार्यशाळा प्रकाश झोरे, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, अमित लांजेकर यांच्यासह लांजा आगाराचे कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.












