खाडीत मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराचा बुडून मृत्यू ,मोर्वे तांबळडेग येथील घटना

देवगड : प्रतिनिधी

खाडीमध्ये पागाने मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तांबळडेग खाडीत घडली.जतीन चंद्रकांत कोचरेकर(४५) रा.तांबळडेग मधलीवाडी असे बुडून मयत झालेल्या मच्छिमाराचे नाव असून त्याचा मृतदेह रविवारी सकाळी ९ वा.सुमारास तांबळडेग मोर्वे खाडीच्या संगमाजवळ आढळला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तांबळडेग मधलीवाडी येथील जतीन चंद्रकांत कोचरेकर हे रविवारी पहाटे ४ वा.सुमारास तांबळडेग मोर्वे खाडीमध्ये पागाने मच्छिमारी करण्यास गेले होते.मच्छिमारी करताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला.त्यांचा मृतदेह तांबळडेग मोर्वे खाडीच्या संगमाजवळ आढळला.याबाबतची खबर सुरेशदेव विश्वनाथ सारंग(रा.तांबळडेग मधलीवाडी) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून तपास पो.हे.कॉ.गणपती गावडे करीत आहेत.