रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावातील शिवाजी वाडी येथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन आज, १५ जुलै रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी टेंभ्ये गावातील अबालवृद्ध, महिला आणि शिवप्रेमी ग्रामस्थ अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गावाच्या इतिहासात हा अत्यंत मानाचा आणि ऐतिहासिक क्षण असून, या स्मारकामुळे येणाऱ्या पिढीला महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची, शौर्याची आणि विचारांची अखंड प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. भूमिपूजन सोहळ्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारकाचे काम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी शिवप्रेमींनी बोलून दाखवला.
Home महत्वाच्या बातम्या टेंभ्ये शिवाजी वाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शुभारंभ; भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न













