मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व इतर नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा
सावंतवाडी:
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मतदारसंघात आणि राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिंधुदुर्गसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
राजकीय वर्तुळातून दीपक केसरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची मोठी मांदीयाळी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर आणि आमदार निलेश राणे आदींसह राज्यातील अनेक प्रमुख नेतेमंडळींनी केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मतदारसंघातील उत्साहाबरोबरच मुंबई येथे केसरकर यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत त्यांचा वाढदिवस साजरा केला. मुंबईतील निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कौटुंबिक सोहळ्याप्रसंगी त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ आणि नातू अर्जुन यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित होते.
दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.













