रत्नागिरी : प्रतिनिधी
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा-शिवाजीनगर येथील खाते धारकाने देशभरातील ५२ सायबर तक्रारीमधील नागरिकांची फसवणूकीच्या माध्यमातून दिशाभूल व तोतयेगिरी केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयित खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १ जानेवारी २०२६ ते आजपर्यत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली आहे. संशयित खातेधारकाने इतर आरोपींशी संगनमत करुन देशभरातील विविध भागात दाखल असलेल्या एकूण ५२ सायबर तक्रारीमधील नागरीकांची विविध फसवणूकीच्या माध्यमातून दिशाभूल व तोतयेगिरी केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस वैभव शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात संशयित बॅंकेच्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.













