आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगांव येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

​सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजगांव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ सह गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

​या सामाजिक उपक्रमाच्या वेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे व मधु कुंभार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील केंद्रप्रमुख प्रज्ञा राऊळ, मुख्याध्यापक अनंत बांदेकर, शिक्षिका शिवप्रिया सावंत आणि शिक्षिका नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय अंगणवाडी ताई आणि एकनाथ हळदणकर यांच्यासह परिसरातील नागरिक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.