मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री विठ्ठल रखुमाई देवालय, पळसंब वरचीवाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने २५ जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८:३० वाजता
शासकीय महापूजा राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व सेवाकर भवन, वांद्रे (पूर्व) येथील सहाय्यक आयुक्त श्री. मंगेश आत्माराम साईल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सकाळी १०:०० ते १२:०० वाजता
उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक भान जपण्यासाठी जुने परंतु वापरण्यायोग्य असलेल्या कपड्यांचे संकलन केले जाईल. हे संकलित झालेले कपडे अनाथ आश्रमाला दान करण्यात येणार आहेत.
दुपारी २:०० वाजता: रवळनाथ प्रफुल भजनी मंडळ, आडवली – भटवाडी
दुपारी ३:०० वाजता: श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब गावठाण
दुपारी ४:०० वाजता: भावई प्रासादिक भजन मंडळ, मालडी.
सायंकाळी ५:०० वाजता ह.भ.प. सौ. आरती सुनिल बापट (नारिंग्रे) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांना श्री. विनोद परब (नारिंग्रे) हार्मोनियमची, तर श्री. सिद्धेश देवधर (हिंदळे) तबल्याची साथसंगत करतील.
रात्री ७:३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, पळसंब (वरचीवाडी) यांच्या वतीने दिंडी भजनाचा कार्यक्रम पार पडेल.
उपस्थितीचे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यानी केले आहे.













