आषाढी एकादशीनिमित्त माजगावात ‘दिंडी चालली…..वाजे टाळ मृदूंग’ संगीत मैफलीचे आयोजन

 

 

सावंतवाडी :आषाढी एकादशीच्या निमित्ताने माजगाव येथील संगीत मित्रमंडळ यांच्या वतीने ‘दिंडी चालली…..वाजे टाळ मृदूंग’ या भक्तिमय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील अभंग, भक्तिगीते आणि भक्तिरसाने ओतप्रोत संगीत मैफल सादर केली जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री देव महादेव मंदिर, माजगाव येथे होणार आहे.आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व संगीतप्रेमी, वारकरी आणि भाविक भक्तांनी उपस्थित राहून भक्तिमय श्रवणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.