चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. हा उपक्रम कलाशिक्षक सुशीलकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक विनोद पवार, ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत जडये तसेच महेन्द्र साळगांवकर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्थानिक रानभाज्या संकलित करून त्यांची नावे, पोषणमूल्ये, औषधी गुणधर्म आणि उपयोग यांची माहिती आकर्षक पद्धतीने सादर केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे उपस्थितांनी कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी महत्त्व समजण्यास मदत झाली.












