देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, पर्यवेक्षक प्रा. लुंगसे, निखिल कोळवणकर, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षणविषयक विचार आणि राष्ट्रप्रेम यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक करताना विचारांची मांडणी, आत्मविश्वास आणि भाषाशैली याबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक- नीरज पंदेरे(इयत्ता १२वी संयुक्त- वाणिज्य),
द्वितीय क्रमांक- सिद्धी झोरे(इयत्ता १२वी वाणिज्य),
तृतीय क्रमांक- तन्वी खांडेकर(इयत्ता ११वी वाणिज्य- ब) यांनी पटकावला.
उत्तेजनार्थ क्रमांक- सायली पांचाळ (इयत्ता १२वी बँकिंग) व आकांक्षा शिवगण (इयत्ता १२वी कला) यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेतील सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे तसेच प्रा. सीमा शेट्ये, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. सानिका भालेकर, प्रा. देवयानी जोशी, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. तावडे, प्रा. कांबळे आणि सहाय्यक हेमंत कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.