शिक्षण हे प्रगतीचे मूळ! दिलीपकुमार महाजन

▪️मुणगे आपईवाडी शाळा इमारतीचे दिमाखात उद्घाटन.

मसुरे | झुंजार पेडणेकर 

शिक्षण हे प्रगतीचे मूळ आहे आणि ती प्रगती साध्य करण्यासाठी आपल्या मुलांना एक उत्तम आणि सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे असते.

शाळेची जुनी इमारत आणि त्यासोबत येणाऱ्या विविध समस्या आपण सर्वांनी जवळून पाहिल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी अनेक समस्यांवर मात करत शाळा दुरुस्तीसाठी ११ लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडून प्राप्त केला. त्या नंतर शाळेचे दुरुस्तीचे काम झाले आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे शाळेची इमारत नवीन स्वरूपात दिसत आहे असे प्रतिपादन माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिलीपकुमार महाजन यांनी येथे व्यक्त केले.

मुणगे आपईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले व सामाजिक कार्यकर्ते दिलिपकुमार महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासक सरपंच अंजली सावंत, प्रशासक उपसरपंच दशरथ मुणगेकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणाली मराठे, पोयरे-मुणगे केंद्रप्रमुख रत्नकांत उदगिरे, प्रमोद सावंत, धर्माजी आडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार सोनटक्के, संजय बांबुळकर, समाजसेवक आनंद मालाडकर , प्रसिद्ध भजनी बुवा राजेंद्र प्रभू, रविना मालाडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मुणगेकर, उपाध्यक्ष सदाशिव परब आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक सोनटक्के व दत्तात्रय मुणगेकर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. सुनील पारकर यांनी, प्रशालेचे शिक्षक व पालक वर्गाच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरव करून काही समस्या निर्माण झाल्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सदाशिव ओगले यांनी आपवाडी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. यावेळी पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, तुषार आडकर, प्रणय महाजन, उज्वला महाजन, विजय पडवळ, अरुण पेडणेकर, निलेश सावंत, सरिता गुरव पेडणेकर, दुर्गा परब,भूषण पडवणकर, अशोक मुणगेकर, प्रशांत पाटकर, भास्कर परब, बाळकृष्ण परब, सुनील महाजन, संध्या महाजन, आदी पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रप्रमुख रत्नकांत उ‌दगिरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक नंदकुमार सोनटक्के यांनी आभार मानले.