अैवद्य दारू विक्री प्रकरणी खांबाळे भुतलवाडी येथील एकाला अटक : ८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त,

वैभववाडी प्रतिनिधी :
अवैद्य दारू विक्री करणाऱ्या खांबाळे भुतलवाडी येथील दर्शन चद्रंकांत पवार (वय-३६) याला पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडील गोवा बनावटीच्या ८ हजार ४०० रूपये किमंतीच्या १२० बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई सोमवारी सायकांळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वीस दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.
अवैद्य दारू विक्री कायम स्वरूपी बंद करावी अशी भुमिका खांबाळे गावातील नागरिकांनी घेतली आहे. यासंदर्भात गावात गावसभा घेवुन दारूबंदीविषयी एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांशी भेट घेवुन चर्चा देखील केली होती. असे असताना देखील खांबाळे भुतलवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैद्य विक्री होत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, जितेंद्र कोलते, संदीप राठोड, रणजित सावंत, रणजित दबडे, सोनल गोसावी, पोलीस पाटील रूपेश कांबळे यांनी काल रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता तेथे दर्शन पवार हा दारू विक्री करताना आढळुन आला. त्याला पोलीसांनी ताब्यात घेतला. त्यांच्याकडुन ८ हजार ४०० रूपये किमंतीच्या १२० बाटल्या जप्त केल्या. दारूबंदी कायद्यानुसान त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.