खेड शिवतर गावची सून झाली अवर सचिव 

खेड (प्रतिनिधी)श्रीमती विमलताई काशिनाथ कदम शिवतर (दत्तवाडी) यांच्या सून सौ. शोभना (शोभा) सतीश कदम यांना मंत्रालयात नियोजन विभागात कक्ष अधिकारी या पदावरून अवर सचिव (गट अ) या पदावर पदोन्नती मिळाली आहे.

 

शिवतर गावाला वीर सैनिकाची ओळख आहे. गावामधील अनेक जन देशाच्या सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच आता गावच्या सुनबाईंना राज्यातील महत्वाच्या पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांच्यावर खेड तालुक्यासह संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.