अंजनवेल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मुंढर /वार्ताहर:
गुहागर तालुक्यातील अंजनवेल विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान ता. चिपळूण संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागीरथीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल ता. गुहागर या प्रशाळेत गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गोरीवले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सरस्वतीच्या प्रतिमेला मुख्याध्यापक मंगेश गोरीवले तर डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या प्रतिमेला जेष्ठ शिक्षक शिवाजी सरगर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा दिनाविषयी महत्व विषद केले. यामध्ये जान्हवी जांगळी, सोहम सैतवडेकर, संयुक्ती नाटेकर,आर्या नाटेकर, सोहम शिगवण, अथर्व घडशी, अपूर्वा वाडये, आर्या भोरजी, अपेक्षा नाटेकर, निल खाकम, तुषार आगीवले, भावेश सांगळे या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रति आदर व्यक्त केला.
तर शिवाजी सरगर, शावरी बंदिछोडे, प्रा. उज्वला भोबसकर प्रा. उमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा या दिनाविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश गोरीवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनविषयी आदर व्यक्त करणे आवश्यक आहे. गुरूंनी केलेले मार्गदर्शन आचरनात आणले तर भारत जगात आदर्शदायी बनेल असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश गोरीवले, शिवाजी सरगर, शावरी बंदिछोडे, दीपाली कांबळे, शलाका पाटील, सोनाली अहिराराव, उज्वला भोबस्कर, संतोष लवंडे, रवींद्र हळदे, सूर्यकांत डीके यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनिष्का किल्लेकर तर आभार कु.रिद्धी लवंडे यांनी व्यक्त केले.