वैभववाडी प्रतिनिधी :
सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त सडूरे ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण करत देशसेवेसाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास सरपंच दीपक चव्हाण, माजी सरपंच विजय रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत जाधव, विठ्ठल काटे, खांबाळेचे माजी सरपंच गणेश पवार, विक्रांत पवार, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल राऊत, सागर मेजारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.












