सहवेदना..सौ. अनिता कामत

बांदा : प्रतिनिधी

कास – कोल्हेभाटवाडी येथील सौ. अनिता अरूण कामत (वय ६५, सध्या रा. डोंबिवली) यांचे अल्पशा आजाराने गुरूवार ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दिर, जाऊ असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या त्या वहिनी होत.