अशी आहेत आरोपींची नावे
कणकवली : शहरातील नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या एका लॉजच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर कणकवली पोलिसांनी मंगळवारी (11 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून 14 हजार 400 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिसांनी अशोक चेतन भोई (रा. नाडकरणी चाळ, कलमठ), शिवा शिवानंद पाटील (रा. टेंबवाडी, कणकवली), चेतन विश्वनाथ माने (रा. बांधकरवाडी, कणकवली), महेश भिकाजी मोरे (रा. नाडकरणी चाळ, कलमठ) आणि राजू शिवराम जमादार (रा. सोनगेवाडी, कणकवली) यांना ताब्यात घेतले.
डायल 112 वर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली. याप्रकरणी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार दीपक चव्हाण करीत आहेत.










