मळई येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जय बजरंग क्रिकेट क्लब,मळईच्यावतीने आयाेजन

देवगड: प्रतिनिधी

 

जय बजरंग क्रिकेट क्लब, मळईच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावी व बारावी परिक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान साेहळा शनिवारी सायंकाळी मळई हनुमान मंदीर येथे संपन्न झाला.

 

दहावी व बारावीमधील उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना जय बजरंग क्रिकेट क्लबच्यावतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करून सन्मान करण्यात आला.यावेळी न.पं.बांधकाम सभापती राेहन खेडेकर,बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाचे अध्यक्ष संजय काेळंबकर, खजिनदार राजशेखर मणचेकर, पाटील प्रदाेष काेयंडे, उमेश भाबल, दिपक सारंग, सुदाम काेयंडे, मुरारी भाबल, साै.मृणालीनी भाबल,सचिन मुणगेकर,रूपेश मणचेकर, हर्षल मणचेकर, माेरेश्वर मेस्त्री, नितीन कणेरकर,सागर मालंडकर, हर्षद वाडेकर, महेश पांचाळ आदी मळई ग्रामस्थ आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित हाेते.