लांजा (प्रतिनिधी) भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा (दक्षिण रत्नागिरी) जिल्हा उपाध्यक्षपदी लांजातील अनिल कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
अनिल कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय पदाधिकारी ,कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्ष संघटने कडून त्यांची अनुसूचित जाती मोर्चा (दक्षिण रत्नागिरी) जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे यांनी दिले असून
पक्षाच्या ध्येय धोरणांना अधीन राहून आणि आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी काम करा अशा प्रकारच्या सूचना या पत्रात केल्या आहेत.
सदर पत्र देताना भाजपाचे नेते, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान अनिल कांबळे यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर लांजा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.













