अंजनवेल कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी पदी निल खाकम तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी रिद्धी संदीप लवंडे यांची निवड

मुंढर /वार्ताहर
डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागीरथीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक शालेय निवडणूक 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निवडणुकीत कॉलेज जनरल सेक्रेटरी या पदी नील मनोज खाकम तर लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह या पदासाठी रिद्धी संदीप लवंडे यांची बहुमताने निवड झाली.
या कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीचा प्रचार सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांचे उमेदवारांनी जोरदार पद्धतीने केला. या निवडणुकीमध्ये जनरल सेक्रेटरी ,लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह, सांस्कृतिक मंत्री, क्रीडामंत्री,सहल मंत्री, आरोग्यमंत्री,स्वच्छता मंत्री,शिस्त मंत्री,पर्यावरण मंत्री अशा नउ पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला. शेवटच्या दिवशी लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
जनरल सेक्रेटरी या पदासाठी नील मनोज खाकम व ओम स्वप्निल संसारे यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये नील मनोज खाकम सर्वाधिक मतांनी विजयी झाला तर सहाय्यक जनरल सेक्रेटरी पदी ओम संसारे याची निवड करण्यात आली. लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह या पदासाठी रिद्धी संदीप लवंडे तर तर सहाय्यक म्हणून श्रेया तुषार नरवणकर यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक मंत्रिपदसाठी अर्णव प्रमोद सैतवडेकर, अपूर्वा संदेश वाडये, श्रेयसी संदेश कांबरे, रिया लवू पड्याळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये सांस्कृतिक मंत्री पदी रिया लवू पडयाळ तर सहाय्यक पदी अपूर्वा संदेश वाडये हिची निवड करण्यात आली.
क्रीडामंत्री पदासाठी अनुष्का दत्ताराम जाधव, संयुक्ति रोहिदास नाटेकर, हर्ष विश्वास जांभरकर, सार्थक सत्यजित सैतवडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये क्रीडा मंत्री पदासाठी हर्ष विश्वास जांभारकर तर सहाय्यक पदी सार्थक सत्यजित सैतवडेकर याची निवड झाली. सहल मंत्रीपदासाठी निधी संदीप लवंडे,अथर्व प्रभाकर पावस्कर, कस्तुरी ऋषिकेश गुरव, आस्वाद प्रमोद पटेकर, हर्षद संतोष पाते यांनी उमेदवारी दाखल केली होती यामध्ये सहल मंत्री पदी हर्षद संतोष पाते तर सहाय्यक सहाय्यक पदी निधी संदीप लवंडे यांची निवड झाली.
आरोग्य मंत्रिपदासाठी सोहम संदेश सैतवडेकर, यशश्री लक्ष्मण सैतवडेकर, शर्वरी सुदेश गुळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये मंत्री पदासाठी शर्वरी सुदेश गुळेकर सहायक पदी यशश्री लक्ष्मण सेतवडेकर यांची निवड झाली. स्वच्छता मंत्री पदासाठी मुग्धा सुनील चव्हाण, रोहन जीवन शितूत,आराध्या अमित कुरुधुंडकर यापैकी स्वच्छता मंत्री पदी मुग्धा सुनील चव्हान तर सहाय्यक पदी आराध्या अमित कुरुधुंडकर यांची निवड करण्यात आली.
शिस्त मंत्री पदासाठी अथर्व राजेंद्र घडशी तर सहाय्यक पदी जान्हवी सागर जांगळी यांची निवड झाली. आणि पर्यावरण मंत्री या पदासाठी श्लोक लहू कुरुधुंडकर, प्राची सुधीर कडव, तनया रत्नाकर भोरजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये पर्यावरण मंत्रीपदी प्राची सुधीर कडव तर सहाय्यक पदी श्लोक लहू कुरुधुंडकर यांची निवड करण्यात आली.
निवडणूकीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.तसेच भारतीय लोकशाहीचा विजय असो अशा निवडणूक उत्सवाच्या घोषणा देण्यात आल्या.