जैतापूर (वार्ताहर): तालुक्यातील जैतापूर चव्हाटावाडी येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी विद्याधर करगुटकर (८६) यांचे बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे रहाते घरी वृध्दापकालाने निधन झाले. मेरिटाईम बोर्ड रत्नागिरी येथील उपअभियंता वेदभूषण करगुटकर यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीमती लक्ष्मी करगुटकर या मनमिळाव् स्वभावाच्या व परोपकारी वृत्तीच्या होत्या. वृध्दापकालामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. मंगळवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी जैतापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती लक्ष्मी करगुटकर यांच्या निधनाची वार्ता समजताच करगुटकर कुटुंबीय, नातेवाईक तसेच जैतापूर परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेत जैतापूर व परिसरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांतून करगुटकर कुटुंबीयांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.













