केळवत घाटात चारचाकी गाडीची दुचाकीला धडक; दुचाकीवरील तिन जखमीतील एकाचा मुंबई येथे उपाचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

मंडणगड प्रतिनिधी : . तालुक्यातील केळवत घाटाच्या उतारावर ब्रिजा या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 7 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. या अपघात पायासह पुर्ण शरिरास गंभीर जखमी झालेल्या राजू नबीसाब मुल्ला वय 52 राहणार पालघर याचा 12 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबई येथील के.एम. रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघाताचे घटने प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेहबूब नबीसाब मुल्ला (वय 49, रा. पालघर, ता. मंडणगड) यांनी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार फिर्यादी यांचा मोठा भाऊ राजू नबीसाब मुल्ला (वय 52) हे त्यांच्याकडे काम करणारे कामगार देवकुमार खैरवाल व जैमुद्दीन शेख यांच्यासह (गाडी क्रमांक एम.एच. 08 एक्स 7357) दुचाकीवरून मंडणगड येथे येत होते. दरम्यान, केळवत घाटात आलेले असताना समोरुन ब्रिझा गाडी घेऊन येणारे (गाडी क्र.एम.एच. 12 झेड.एस.5347) आशुतोष अशोक पंढरपूरकर (वय 54, रा. उज्ज्वल भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) याने चालवत वाहनाने फिर्यादी यांचे भावाचे दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रवास करणारे राजू नबीसाब मुल्ला, देवकुमार मेहलाल खैरवाल (वय २७, रा. महाड, जि. रायगड, मूळ रा. मध्य प्रदेश) आणि जैमुद्दीन आनू शेख (वय ४२, रा. सौमित्रनगर, बायपास, मुंबई) हे तिघे जखमी झाले. त्यांना लहान-मोठ्या तसेच गंभीर दुखापती झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 133/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही ग्रामिण रुग्णालय भिंगळोली येथे तातडीचे प्रथमोपचार करुन प्रथम डेरवण येथील रुग्णालयात व तेथून मुंबई येथील के.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान फिर्यादी यांचा मोठा भाऊ राजू नबीसाब मुल्ला (वय 52) राहणार पालघर यांचा 12 नोव्हेंबर 2026 रोजी दुर्दैवीरित्या मृत्यू झाला त्यांचे पार्थिवावर पालघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.