पैसाफंड च्या समोरच्या सर्व्हिस रोड ची दैनावस्था

मुलांना काढावी लागतेय चिखलातून वाट

माखजन:
संगमेश्वर तालुक्यतील पैसाफंड हायस्कूल समोर सर्व्हिस रोड ला चिखलाची.अक्षरशः दलदल झाली आहे.पैसाफंड ला येणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या हा चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे.
व्यापारी पैसाफंड सोसायटीचे,पैसाफंड हायस्कुल सुमारे हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.या शाळेच्या बाहेर सध्या चिखलाचा ढीग,पाणी यामुळे बकालीकरण झाले आहे.याचं सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या गाड्या,यामुळे पादचारी मुलांना ये जा करसार्वजनचे झाले आहे.
ह्या गोष्टीचा पाठवपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करून देखील याकडे अद्याप दुर्लक्षच झाले आहे.शाळेत येणाऱ्या मुलांचे पाय चिखलाने भरत आहेत.चिखलातून मजल दरमजलं करत विद्यार्थ्यांना तसेच चिखलाच्या पायानी वर्गात बसावे लागत आहे.सर्व्हिस रोड वरील या भीषण परिस्थिती मुळे वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात दिवा,मुंबई,ठाणे या ठिकाणाहून कोकणवासीय येत असतात.त्यामुळे गणेशोत्सव काळात संगमेश्वरात स्थिती अजूनच बिकट होणार आहे.गतवर्षी संगमेश्वर च्या आसपास ट्राफिक जाम होत होते.पाच सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असायच्या,या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी यावर कायमची उपाययोजना होईल असे गेल्या वर्षी वाटत असताना,यावर्षीही जैसे थे परिस्थिती आहे:याकडे खर तर सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
या सर्व्हिस रोड वरून जाता येताना अनेकवेळा चिखलात घसरुन पडण्याचे विद्यर्थ्याने प्रमाण वाढले आहे.याकडे तात्काळ लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी हित आहे.