बडबड गीत : प्रथम आरोलकर, चित्रकला : काव्या धानजी व निबंध स्पर्धेत चिन्मय पालयेकर प्रथम
वेंगुर्ले : दाजी नाईक
शब्दांकुर कलामंच, आरवली तर्फे जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १ मधील मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये बडबड गीत प्रथम आरोलकर, चित्रकला मध्ये काव्या धानजी व निबंध स्पर्धेत चिन्मय पालयेकर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेच्या वेळी शब्दांकुर कलामंच चे अध्यक्ष श्री. कमलेश प्रकाश अणावकर, सचिव श्री. राजेश रामचंद्र मोंडकर, खजिनदार ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आणि सदस्या सुप्रिया नाईक उपस्थित होते. तसेच जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १च्या मुख्याध्यापिका श्रीम. सविता सातपुते, शिक्षिका श्रीम. प्रियदर्शनी म्हाडगुत, शिक्षक श्री. संजीव बुच्छलवार आणि अंगणवाडी सेविका श्रीम. वासंती नाईक, श्रीम. वेदीका गुरव उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे परीक्षण निवृत्त मुख्याध्यापिका श्रीम.अस्मिता पालयेकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल असा. यामध्ये *बडबड गीते* प्रथम – प्रथम महेश आरोलकर (अंगणवाडी), द्वितीय – श्रीया श्रीपाद गुरव (अंगणवाडी), तृतीय – शिया अमोल आग्रे (अंगणवाडी) तर उत्तेजनार्थ – प्रज्ञेश रामचंद्र बागकर ( पहिली ) निशांत नागेश आरोलकर आणि रेयांश गणेश पालयेकर.( दुसरी ) यांचा समावेश आहे. *चित्रकला* प्रथम- काव्या प्रमोद धानजी ( चौथी ), द्वितीय- अथर्व शंकर डोंगरे ( तिसरी ), तृतीय- वेदा सदाशिव मेस्त्री ( चौथी ) तर उत्तेजनार्थ- सान्वी लक्ष्मण मांजरेकर ( चौथी ) यांनी क्रमांक मिळविला. तर *निबंध* या स्पर्धेमध्ये प्रथम – चिन्मय गणेश पालयेकर ( सातवी ), द्वितीय- सौरभ सुनील मेत्री ( सातवी ), तृतीय – मेघना संतोष नाईक ( सहावी ) तर उत्तेजनार्थ – स्वानंद महेश दळवी (सातवी ), मनस्वी प्रवीण दळवी ( पाचवी ) यांचा समावेश आहे.
विजेता स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. म्हाडगुत मॅडम यांनी केले. त्यानंतर श्रीम.पालयेकर मॅडम यांनी मुलांना शुद्ध लेखन संदर्भात मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. श्री. कमलेश प्रकाश अणावकर यांनी शब्दांकुर कलामंच आरवली तर्फे जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर १ मधील उपस्थित सर्व शिक्षक आणि मुलांचे आभार मानले.












