राजापूर प्रतिनिधी: राजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप मधुकर ऊर्फ दिलूभाई कोरगावकर (वय ६८) यांचे गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजापूर शहरातील सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दिलीप कोरगावकर यांनी राजापूर नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून काम करताना आपल्या प्रभागातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. दिलूभाई या नावाने ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या राजापुरातील निवासस्थानी धाव घतेली. त्यांच्या निधनाबद्दल राजापूर नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वृंदाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी राजापूर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.












