शुभांगी पळसंबकर यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी :

पळसंब बौद्धवाडी येथील

श्रीमती शुभांगी सुरेश पळसंबकर (65 वर्ष ) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे, पुतण्या, जावई, नंदा, भाऊजी असा मोठा परिवार आहे. राजसी कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. सावनी राज पळसंबकर यांच्या चुलत सासूबाई होत.