कुणकेश्वर मंदिर येथे पादचारी मार्गाचे लोकार्पण संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर परिसरात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे बाळ ख डपे ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे आज कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीचे अवचित्य साधून दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी या पुलाचे लोकार्पण केले.

 

कुणकेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी या पादचारी मार्गाचे बांधकाम करण्यात आले असून यामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या पुलाचा उपयोग दर्शन रांग लावण्यासाठी होणार असल्याने देव कुणकेश्वरचे दर्शन यामुळे सुकर होणार आहे या विकासकामामुळे भाविकांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 77 लाख रुपये निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला.