भाजपा ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुखपदी संतोष नलावडे यांची निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुखपदी संतोष नलावडे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. ही निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस व ओबीसी मोर्चा प्रभारी आ. योगेश सागर आणि ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी जाहीर केली. या निवडीबद्दल संतोष नलावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून संतोष नलावडे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन्ही क्षेत्रात वावरत असतांना सर्वसर्वमान्यांशी उत्तम संवाद राहिला आहे. यामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नलावडे यांना पदे नेहमीच सन्मानाने मिळाली आहेत. आता तर भाजपने संतोष नलावडे यांच्यावर भाजपा ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी संपवली आहे.
या निवडीबद्दल संतोष नलावडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी आ. योगेश सागर, प्रदेश अध्यक्ष आ. योगेश (अण्णा) टिळेकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवताना भाजपा ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुखपदी निवड केल्याबद्दल शतश: आभारी आहे, अशा शब्दात या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भाजपा ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुख पदाच्या माध्यमातून मुख्यमंत्रींना ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी आ. योगेश सागर, प्रदेश अध्यक्ष आ. योगेश (अण्णा) टिळेकर यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा रायगड मतदार संघाचे खासदार नारायण राणे, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, आ. प्रशांत ठाकूर, आ. निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधू रत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष माजी आ. डॉ. विनय नातू, भाजप नेते वैभव खेडेकर, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंतचा कोकण दौरा करताना भाजप ओबीसी मोर्चा सहसंपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन आढावा घेतला जाणार आहे. यातून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही संतोष नलावडे यांनी दिली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी श्री. नलावडे यांनी दिली.