वेंगुर्लेतील खर्डेकर महाविद्यालयात “मुंबई विद्यापीठाच्या शूटींग स्पर्धेचे” दिमाखात उद्घाटन…
वेंगुर्ले : दाजी नाईक
“शूटींग हा केवळ लक्ष्यावर नेम साधण्याचा खेळ नाही; तर मनाची एकाग्रता, संयम, आत्मविश्वास आणि अचूक निर्णयक्षमता विकसित करणारा क्रीडाप्रकार आहे. लक्ष्य कितीही कठीण असले तरी ते साध्य करण्यासाठी मन स्थिर ठेवणे आणि सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत पुरुष व महिला शूटींग स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन दिमाखात पार पडले. कोकण विभागातील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या युवा नेमबाजांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) धनराज गोस्वामी, पत्रकार शेखर सामंत, कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेटे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे सचिव डॉ. चंद्रकांत नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेंद्र खामकर, उपरकर शूटिंग रेंजचे संचालक कांचन उपरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. सुदाम माने, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. कमलेश कांबळे आणि पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे आदी उपस्थित होते.
क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची रूपरेषा, आयोजना मागील भूमिका तसेच शूटींग या क्रीडा प्रकाराचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी पत्रकार शेखर सामंत, प्राचार्य प्रो. (डॉ.) धनराज गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई तसेच कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर डॉ. विवेक चव्हाण यांनी आभार मानले.













