वेंगुर्ले : प्रतिनिधी
विद्यार्थी गुणगौरव हा लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्ट वेंगुर्ला यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट वस्तू च्या रूपाने केलेली मदत आणि ती स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी आई साठी आदरांजली आहे. ट्रस्ट च्या भविष्यातील उपक्रमांना आपले सहकार्य असेल असे प्रतिपादन वेंगुर्ले से नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
केपादेवी शाळा नंबर चार उभादांडा मूठ या शाळेमध्ये लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्ट वेंगुर्ला यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष श्री. गिरप बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पत्रकार श्री महेंद्र मातोंडकर, कीर्तनकार श्री. सावळाराम कुर्ले बुवा, सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत गिरप, यु ट्यूबर श्री मोहित गिरप तसेच श्री भानुदास कांबळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री शंकर जाधव मुख्यद्यापक केपदेवी शाळा, श्री खानोलकर सर मुख्यद्यापक उभादांडा शाळा नंबर तीन, श्री अमोल तांडेल सिंधुदुर्ग श्री विजेते, श्री हरिश्चंद्र गिरप उपाध्यक्ष लक्ष्मी देवजी ट्रस्ट, श्री रामचंद्र देवजी सल्लागार देवजी ट्रस्ट, श्रीमती जाधव मॅडम महिला पोलीस वेंगुर्ला पोलीस ठाणे, श्री राजन कुर्ले, श्री दयानंद पराडकर, सौ काजल पराडकर, सौ काजल रेवणकर, श्री ज्ञानेश्वर पाटील आदी ट्रस्ट पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
ट्रस्ट च्या वतीने भविष्ययात विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून शालेय विद्यार्थी तसेच युवक साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व त्याची तयारी कशी करावी या बाबत तज्ञ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस ट्रस्ट चे सल्लागार श्री रामचंद्र देवजी यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी मुंबई येथील श्री अनिल पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमा चे सूत्रसंचलन व आभार श्री किशोर सोनसुरकर सर यांनी मानले.













