विरण येथे सुशोभित हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न!

 

▪️राकेश परब यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन

मसुरे | झुंजार पेडणेकर :                विरण बाजारपेठ येथील सुशोभीकरण आणि नूतनिकरण केलेल्या हनुमान मंदिराचे उदघाट्न मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र, राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मसदे सरपंच सौ. शमिका वाडकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, वेरली सरपंच धनंजय परब, विरण सोसायटी अध्यक्ष रामदास पांजरी, माजी सरपंच आपु आंबेरकर, मालोंड माजी उपसरपंच जितेंद्र परब, बाबू आंगणे, किरण प्रभू, राजेश पाटील, देवेश नारकर, विशाल, दिनेश आंगणे, सचिन आंगणे, अरुण मेस्त्री, श्री. धुरी, मोहन पांजरी, बापू माड्ये, गणेश नेरूरकर, राजू बेलवलकर, प्रवीण पांजरी, सिद्धेश माड्ये, संतोष मुणगेकर, मनिष परब, बाबू वाडकर, बाळू जंगले, मुकेश नार्वेकर, प्रकाश परब, बाळा परब, संतोष घाडीगावकर, दिपक भोगले, राजू परब, एकनाथ परब, संदिप सावंत, महेश पालव, विजय सकपाळ, भाई घाडीगावकर, अनिल पालव यांच्यासह राकेश परब मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.