प्रा. गौरव पोंक्षे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे युवा पत्रकार पुरस्काराने सन्मान

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील माखजन परिसरात गेली १७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या प्रा गौरव शशिकांत पोंक्षे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे युवा पत्रकार म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माखजन नजिक सरंद येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. गौरव पोंक्षे यांनी गेली १७ वर्षे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न हाताळून प्रकाश टाकला. समाजाची स्पंदने शब्दांकित करत अनेक विषय प्रभाविपणे मांडले.या साऱ्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवा संमेलनात सन्मानित केले. यावेळी ॲड. आशिष आठवले, दिलीप जोशी, बावा जडयार, महेश साळुंके, रवींद्र रजपूत, प्रसाद कवळकर, प्रमोद बापट, सचिन साठे, सुयोग साठे,

संदेश पोंक्षे आदी उपस्थित होते.