माखजन इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी केली भजन सेवा

गुरुकुल पूरक उपक्रम

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कुल च्या गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी भजन सेवा केली.

श्रावणी सोमवार चे औचित्य साधून नजिकच्या बुरंबाड येथील प्राचीन अशा श्री आमनायेश्वर मंदिरात भजन सेवा केली.प्रशालेच्या कै.पांडुदादा लघाटे संगीत कक्षात विद्यार्थी संगीताचे धडे गिरवत आहेत.संगीत शिक्षक श्री विशारद गुरव यांनी विद्यार्थ्यांची विविध भजने बसवून घेतली होती.स्वतः संगीत शिक्षक विशारद गुरव यांनी जय शंकरा गंगाधरा हे गीत आळवून वेगळी रंगत आणली.

यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी व भाविकांनी या भजन सेवेचा आस्वाद घेतला.यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करत श्री देव आमनायेश्वर देवस्थान ने विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिली.यावेळी गुरुकुल उपक्रम प्रमुख सचिन साठे,ओंकार मुळये आदि उपस्थित होते.