रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी प्रकाश शिगवण

मंडणगड | प्रतिनिधि : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी मंडणगड येथील प्रकाश शिगवण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, चित्राताई चव्हाण, रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कानोजे, जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम, खेड तालुकाध्यक्ष उमेश कदम, गणेश कदम, सरवर कुडूपकर , सुरज जोगळे, मारुती पालणकर, संतोष धाडवे, रविंद्र रटाटे, सुजित लोखंडे, रंजन महंत, धीरज कदम, भावेश लागण आदीसह रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान असेल आणि याकामी आपण पक्षाच्या पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्री. प्रकाश शिगवण यांनी सांगितले.