रोहिदास समाज सेवा संघ चिपळूणची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
चिपळूण (संतोष सावर्डेकर) रोहिदास समाज सेवा संघ, चिपळूण या सामाजिक संस्थेने नेहमीच समाज उपयोगी उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि भविष्यात देखील या उपक्रमांना प्राधान्य देण्याबरोबरच अन्याय विरोधात आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही या संस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांनी रोहिदास भवन येथे आयोजित ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी दिली.
रोहिदास समाजसेवा संघ या सामाजिक संस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळीमागील सभेचे इतिवृत्त व जमा खर्च वाचन व मंजुरी याचबरोबर अन्य विषयांना देखील मंजुरी देण्यात आली.
यानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच नवराष्ट्र पुरस्कृत समाज भूषण पुरस्कार प्राप्त संस्थेचे उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर गुरुजी, उत्कृष्ट कार्यक्षेत्रातील नारदखेरकी सरपंच राघो अंबवकर दापोली कृषी विद्यापीठ उच्चपदस्थ अधिकारी डॉ. संतोष सावर्डेकर, लायन्स क्लब सावर्डे नवनियुक्त सेक्रेटरी सतीश सावर्डेकर, शासकीय सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश सावर्डेकर, स्टेट बँक शाखा चिपळूणमधून सेवानिवृत्त झालेले दीपक खेडेकर, आशा सावर्डेकर, अहिल्याबाई होळकर पुरस्कारप्राप्त सौ. पूजा कदम यांचा संस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच रोहिदास भवन उभारणीत ज्यांनी- ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढली. या भावनात समाजात आपापसातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. महापुरात या रोहिदास भवन मधील मालमत्तेचे नुकसान झाले होते. मात्र, समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिल्याने ही वास्तू पुन्हा सुस्थितीत आणण्यात यश मिळाले, असे सांगितले. तसेच रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण समाज बांधवांच्या नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
यावी सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश सावर्डेकर, नारदखेरकी सरपंच राघो अंबवकर यांनी आपल्या मनोगतात रोहिदास समाज सेवा संघ, चिपळूण या संस्थेने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर, मंगेश पेढांबकर, कोषाध्यक्ष सुनील चिपळूणकर, सरचिटणीस प्रकाश पेढांबकर, सहचिटणीस रवींद्र काजरोळकर, सदस्य वसंत गोवळकर, संतोष रिळकर, सुधीर जानवलकर, अंकुश चिपळूणकर, संदीप चिपळूणकर, अजित आंबवकर, सुरेश सावर्डेकर, नितेश चिपळूणकर, यशवंत पेढांबकर, सौ. रसिका सावर्डेकर, नितीन कमलाकर, रवींद्र सावर्डेकर, समीर जानवरकर, विष्णुपंत सावर्डेकर, गणेश कांबळे, पी. बी. कदम, वसंत चिपळूणकर, विशाल जानवलकर, अशोक काजरोळकर आदी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन संदीप मुंढेकर यांनी केले.
ही सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी मेहनत घेतली.











