श्री हॉस्पिटलमध्ये महीन्याच्या पहिल्या मंगळवारी वंधत्व तज्ञ डॉ गोरख मंद्रुपकर रुग्ण तपासणार

चिपळूण | वार्ताहर : शहरातील श्री हॉस्पिटल येथे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आता वंधत्व आणि टेस्ट ट्युब बेबी तज्ञ डॉ. गोरख मंद्रूपकर हे रुग्णांसाठी सेवा देणार आहेत. या सेवेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा . दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत डॉ. गोरख मंद्रूपकर श्री हॉस्पिटलमध्ये उपस्थित असणार आहेत.
शहरातील श्री हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिजीत सावंत यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक आजारांवरील स्पेशालिस्ट सेवा देण्यासाठी महिन्यातील निश्चित वारांना उपस्थित असतात. सध्या वंधत्व हे एक समस्या जाणवत आहे. मूल न होणे या समस्येसाठी नामवंत डॉ. गोरख मंद्रूपकर चिपळूण मध्ये आता सेवा देणार आहेत. टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ अशा त्यांचा नाव लौकिक आहे. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी डॉ. या संदर्भातले रुग्ण तपासणार आहेत. तरी श्री हॉस्पिटल मध्ये या संबंधित आजारातील रुग्णांनी महिन्याच्या पहिल्या मंगळवारी संपर्क साधून डॉ.गोरख मंद्रूपकर यांच्याकडून तपासणी करून घ्यावी असे आवाहन श्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अभिजीत सावंत यांनी केले आहे.