गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद माखजन येथे दहीहंडी उत्सव झाला.गोविंदा आला रे ..
आला…आम्हा सर्वांना आनंद झाला…अशी विविध गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी फेर धरला..विविध नृत्य सादर केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.विविध गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केली.काही गवळणी देखील सादर केल्या.यावेळी श्रीकृष्ण म्हणून अवधूत शिगवण याला तर राधा म्हणून विधी हेमण हिला नटवण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी तीन थर रचत सलामी देत हंडी फोडली.
मोठ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशालेच्या प्रांगणात तीन थराची हंडी होती.तर शिशु वर्गातील व पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांना वर्गातच हंडी बांधण्यात आली होती.दही हंडीचा हा उत्सव मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रमावेळी संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सहसचिव दीपक शिगवण आदी उपस्थित होते.यावेळी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.













