जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे दहीहंडी उत्सव उत्साहात

गावखडी वार्ताहर:

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी व अंगणवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम मा.मुख्याध्यापक श्री.मसरज शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व गाण्याचा ठेका धरत मुलांनी मनःपूर्वक आनंद लुटला.यावेळी उपस्थित सौ.शाहनाज भाटकर सहशिक्षिका, सौ.सत्यश्री खर्डे अंगणवाडी सेविका,सौ.स्नेहल कुरतडकर, श्रीमती.शारदा ताई गुरव व पालक, आणि ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता .
तसेच जि.प.प्राथमिक शाळा
मेर्वी गुरववाडी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.