पाचल पंचक्रोशी मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहंडीला निमंत्रित गोविंदा पथकांचा सात थरांचा थरार तर रस्सीखेच स्पर्धेत अव्हेंजर्स तळवडे विजेता

पाचल वार्ताहर : राजापूर तालुक्यातील पाचल येथील पाचल पंचक्रोशी मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ही दहींहंडी परंपरेनुसार प्रथम फोडण्याचा मान स्थानिक पाचल गावातील गोविंदा पथकांना देण्यात आला. मात्र त्यानंतर उभारण्यात आलेल्या दहीहंडीला तालुक्यातील शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर, श्री कालिकादेवी माता गोविंदा पथक भू पंचक्रोशी, हनुमान प्रसन्न खडपेवाडी व मारूती प्रसन्न आंबेवाडी या निमंत्रित गोविंदा पथकानी सात थर लावत सलामी दिली. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
तर रस्सीखेच स्पर्धेतील विजेते अव्हेंजर्स तळवडे प्रथम क्रमांक, ए वन कृषी सेवा केंद्र पाचल द्वितीय क्रमांक तर गुरववाडी पाचल यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
राजापूरचे आमदार किरण सामंत व शिवसेना  युवा नेत्या एड. अपुर्वा सामंत यांसह मान्यवरांच्या हस्ते या गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात आला. तर रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यांनाही रोख पारितोषीके देऊन गौरविण्यात आले.
  दवरर्षी प्रमाणे यंदाही पाचल येथील पाचल पंचक्रोशी मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर या उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने रस्सीखेच स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या रस्सीखेच स्पर्धेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या संघांना राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी पंचक्रोशीच्या वतीने मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते संदीप बारसकर व सुरेश ऐनारकर यांच्या हस्ते आमदार किरण सामंत व अपूर्वा सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच बाबालाल फरास, माजी उपसरपंच किशोर नारकर, व्यापारी संघटना अध्यक्ष आण्णा पाथरे, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते संदीप बारसकर, सुरेश ऐनारकर, सोनू पाथरे  यांच्यासह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परटवलकर यांनी केले.
या उत्सवाचे पाचल येथील पाचल पंचक्रोशी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अत्यंत चांगले नियोजन केले होत.