प्रत्येक मंडळासाठी असणार एक पोलीस अंमलदार
रत्नागिरी: कोकणातील गणेशोत्सव नेहमीच अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडतो. येथील रस्ते थोडे छोटे असल्यामुळे पोलिसांना नियोजनात काहीशी अडचण येते, मात्र कोकणातील जनता नेहमीच नियमांचे पालन करते. यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे डीजेमुक्त आणि परंपरा जपणारा असावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गणेश मंडळासाठी एक विशेष पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आला आहे. मंडळांचे कोणतेही प्रश्न किंवा अडचणी असल्यास, त्यांनी न संकोचता थेट या नियुक्त केलेल्या अंमलदाराकडे आपली बाजू सांगावी. हे अंमलदार संबंधित मॅडम आणि वरिष्ठांपर्यंत ती माहिती पोहोचवून योग्य समन्वय साधतील. कोकणची समृद्ध संस्कृती जपत रत्नागिरीकरांनी यंदाचा गणेशोत्सव एक आदर्श आणि डीजेमुक्त उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.













