कुवेवासीयांचे कोणतेही काम थांबणार नाही – आमदार किरण सामंत

कुवे येथील बहुउद्देशीय सभागृहाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन

लांजा (प्रतिनिधी) : कुवेवासीयांचे कोणतेही काम थांबणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार म्हणून मी कटिबद्ध आहे. कुवेच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली.
लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे गावातील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन तसेच कुवे नगरपंचायत कार्यालयाचा शुभारंभ आमदार किरण ( सामंत यांच्या उपस्थितीत आज रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी आमदार किरण सामंत हे बोलत होते.
कुवे परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी तसेच स्थानिक प्रश्नांसाठी लांजा येथे जावे लागू नये, नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कुवे येथे नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासन अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.कुवे येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहामुळे ग्रामस्थांना विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. बैठका, महिला बचतगटांचे कार्यक्रम, युवकांचे उपक्रम, सामाजिक कार्यक्रम, शासकीय जनजागृती कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे.
तर कुवे येथे नगरपंचायत कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांना विविध दाखले, स्थानिक विकासकामांशी संबंधित बाबी, नागरी सुविधा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी पुढे बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, जनतेच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी वारंवार हेलपाटे मारू नयेत, त्यांचे प्रश्न त्यांच्या परिसरातच सोडविले जावेत, हा विकासाचा मुख्य उद्देश आहे. कुवेचा विकास हा केवळ एका भागाचा विकास नसून, येथील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे,”
या कार्यक्रमाप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावळी कुरुप, उपनगराध्य बाबा लांजेकर,गटनेते योगेश कावतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत कुंभार, शिवसेना विधान सभाक्षेत्र प्रमुख -राजु कुरूप,तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, बांधकाम सभापती – वैभव जोईल,पाणी सभापती-गुल्ल्या नेवरेकर महिला बालकल्याण बालकल्याण प्रणाली तेली,प्रणिता बोडस नगरसेवक
निधी गुरव,पंडरीनाथ मायशेट्ये , श्रध्दा तोडकरी
सुशिला कांबळे,सिध्देश भूवड,साक्षी मानकर, दूर्वाभाई शेट्ये,प्रांजली यादव, अनिल गुरव, नेहा राडये, सचिन डोंगरकर, मनोहर बाईत,प्रसाद भाई शेटे, परवेश घारे दिलीप मुजावर, आबा सुर्वे श्याम खानविलकर अशोक गुरव जमीन मालक राडये कुटुंबीय तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी कुवेवासी या सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.