वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी घाटात दिशादर्शक फलक, रिप्लेक्टर व रेडियम बसविले
राजापूर प्रतिनिधी: आंबा घाटातुन केवळ एकेरी वाहतुक सुरू असल्याने राजापूर, ओणी,पाचल अणूस्कुरा मार्गावरिल वाहतुकीच्या वर्दळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी अणूस्कुरा घाटातील सुरक्षिततेबाबत अधिक दक्षात घेत घाटातील खड्डे भरतानाच वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक फलक लावणे, रिप्लेक्टर व रेडियम बसविणे व पाचल बाजारपेठेत गर्दी होत असल्याने चार ठिकाणी रमलर स्ट्रीप बसविले आहेत. तर अपघात ग्रस्त वळणांवरही धोकादायक वळण, अपघातप्रवण क्षेत्र असे फलक लावले आहेत.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने सध्या या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण सध्या राजापूर, ओणी पाचल अणूस्कुरा मार्गावर येंत आहे. आता गणेशोत्सव असल्याने या मार्गावर वाहतुक आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनीही या रस्ता व घाटाच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना या विभागाला दिल्या होत्या. तर नुकतीच प्राताधिकारी विश्वजिन गाताडे, तहसीलदार विकास गंबरे व बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कांबळे यांनी घाटाची प्रत्यक्ष पहाणी केली होती. त्यावेळी प्रांताधिकारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सुचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.
राजापूर, ओणी पाचल अणूस्कुरा मार्गावरिल खड्डे भरण्याचे कामा यापुर्वीच हाती घेण्यात आलेले आहे. तर आता बांधकाम विभागाकडून घाटातील खड्डे भरतानाच वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी घाटात दिशादर्शक फलक लावणे, रिप्लेक्टर व रेडियम बसविणे व पाचल बाजारपेठेत गर्दी होत असल्याने चार ठिकाणी रमलर स्ट्रीप बसविले आहेत. अपघात प्रवण क्षेंत्रातही फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आता रात्रीच्या वेळी देंखील या दिशादर्शक फलक व रिप्लेक्टर आणि रेडियममुळे रस्त्याचा अंदाज येणार आहे. साईटपट्टयाही योग्य प्रकारे साफ करण्यात आल्या आहेत.
बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कांबळे यांसह शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी याबाबत विशेष लक्ष देत काम पुर्ण केले आहे. वाहन चालकांनी घाटात सावकाश वाहन चालवून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.










