रस्त्यावर सापडलेला मोबाईल मूळ मालकाला केला सुपूर्द!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना मसुरे बाजारपेठेत रस्त्यावर एक मोबाईल सापडला. चौकशी अंती हा मोबाईल देऊळवाडा येथील वयोवृद्ध ग्रामस्थ मोहन परब यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

मोहन परब यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोबाईल हरवल्यामुळे ते चिंताग्रस्त होते. पत्रकार पेडणेकर यांनी बुधवारी सकाळी हा मोबाईल थेट मोहन परब यांच्याकडे सुपूर्द केला. हरवलेला मोबाईल परत मिळताच परब यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी पेडणेकर यांचे आभार मानले. पेडणेकर यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे मसुरे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.