उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांची आचरे संस्थानास भेट 

41 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवातील श्री गणरायाचे घेतले दर्शन 

आचरा -अर्जुन बापर्डेकर

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमित जामसंडेकर यांनी सहपत्नीक इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरास भेट देत श्रीदेव रामेश्वर व मंदिरातील विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. 41 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची माहिती यावेळी घेतली. श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन सिंधुदुर्गवासीयांच्या सुख-समृद्धी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या चरणी त्यांनी शांतता, ऐक्य आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत राहावी, अशी मनोकामना व्यक्त केली.

या भेटीच्यावेळी रामेश्वर संस्थानंच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आचरा गावचे सॉलिसीटर तसेच देवस्थान ट्रस्टी शिल्पन गावंकर, खजिनदार कपिल गुरव, ग्रामस्थ कर्मचारी वर्ग उपस्थित होते.