गव्या रेड्याच्या सततच्या दर्शनाने आंबव पोंक्षे वासीय धास्तावले,शेतीचे नुकसान

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात गवा रेड्यांच्या सतत च्या दर्शनाने ग्रामस्थ धास्तावले.
गवा रेड्या मुळे तालुक्यात सतत होणारे अपघात आणि नुकसान यामुळे आंबव पोंक्षे गावातील ग्रामस्थ घाबरले आहेत.
आंबव पोंक्षे गावात गेले दोन तीन वर्षांपासून तुरळ च्या सीमेकडे पकडेवाडी, भुवड वाडी च्या बाजूला गवा रेड्यांचे कळप दिसायला लागले.गतवर्षापासून तर शेतामध्ये धुमाकूळ घालायला सुरवात केली.भातशेती,पावटा,कडवा,कुळीत,आदी पिकांची नासधूस केल्याने शेतात पिकच आले नाही.
गवा रेडा हा पूर्णपणे शाहाकारी असून पूर्णतः तृणभक्षी प्राणी असल्याने तो गवत,भातशेती व अन्य शेतातील पिकांकडे सहज आकर्षित होतो.या प्राण्यांचे वजन ८०० ते १५०० किलो पर्यंत असू शकते त्यामुळे आहार मोठा लागतो.परिणामी शेतामध्ये उतरल्यावर शेती साफसूफ करूनच बाहेर पडतात.रातोरात कळप च्या कळप शेतात उतरल्यावर शेकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही.हाच प्रकार आंबव पोंक्षे वासीय गेली दिन वर्षे दुर्दैवी रित्या अनुभवत आहेत.या अजस्त्र प्राण्यांकडून नव्याने लावलेली आंबा,काजूच्या झाडांची नासधूस होत आहे.शेकड्यानी लावलेली झाडें जमीनदोस्त होत आहेत.
आता तर चक्क ह्या गवा रेड्यांचे कळप आंबव पोंक्षे- सरंद आणि आंबव पोंक्षे-आरवली ह्या मुख्य मार्गांवर अचानक दिसत असल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे.शाळकरी मुले याचं रस्त्यावरून पायी ये जा करत असतात.अशा वेळी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असा सवाल ग्रामस्थ विचारात आहेत.
आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे यांनी वनविभागाला ही बाब सातत्याने सांगून झाल्याचे सांगितले.तरी वनविभागाने अद्याप यावर काहीही केलेले नसल्याचे शेखर उकार्डे यांनी प्रसार माध्यमाना सांगितले.
गवा रेड्यांचा वावर आंबव पोंक्षे सह शेजारील तुरळ,नागझरी,सरंद,आरवली,मुरडव,कुचांबे,पाचंबे या गावांना आहे.वन विभाग मात्र याकडे कानाडोळा करत आहे.
काही वर्षांपूर्वी कोकणातील संगमेश्वर तालुक्यात गवा रेडे नव्हते.परंघाट,वन्यजीव भ्रमण मार्गाद्वारे अर्थात आंबा घाट,अणूस्कुरा घाट,कुंभार्ली घाट,आंबोली घाटातून कोकणात उतरले आणि मुबलक चारा आणि जंगले असल्याने कायमचे स्थिरावल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील,गवा रेड्यांचे सर्वांत मोठे मुख्य केंद्र आहे.या ठिकाणातून गव्यांनी कोकणा कडे मोर्च्या वळवल्याने कोकणातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.या गवा रेड्याना वनविभागाने या अभयारण्यात पकडून पुन्हा सोडावे अशी मागणी केली जात आहे.वनविभाग या गोष्टीकडे पूर्णपणे बघ्याची भूमिका घेत असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे.